Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Patan मराठा आरक्षण दरम्यान झालेल्या दंगली प्रकरणी युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आ शंभूराज...

मराठा आरक्षण दरम्यान झालेल्या दंगली प्रकरणी युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आ शंभूराज देसाई

241
Adv

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झाले होते या प्रकरणात मराठा युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांना त्रास होत आहे ते गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आता पुढे सरसावले आहेत

महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाला आरक्षण मुळे संदर्भात विविध पक्षांचे व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली होती या आंदोलनामध्ये सकल मराठा समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत राज्यातील मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनामुळे या सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना त्रास होत आहे ते गुन्हे मागे घ्यावेत असे पत्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचेआमदार शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्र्याकडे दिले आहे

Adv