जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे १५०० कोटींची मागणी

548
Adv

आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असलेल्या ठिकाणांचा वारसा ऐतिहासिक सातारा जिल्हयाला लाभला आहे. लाभलेला
वारसा अधिकाधिक समृध्द करण्यासाठी या ठिकाणांच्या पायाभूत सुविधथा आणि विकासाचे नियोजनबध्द ठोस प्रकल्प आम्ही आपणाकडे सादर करीत आहोत. सुरक्षित आणि सुखदायी पर्यटन आणि सातारकरांना रोजगाराच्या नव्या वाटा निम्माण करुन देणा-या या पर्यटन प्रकल्पांना निधीची कमतरता पड़ु नये याकरीता देशाच्या येणा-या पुरवणी / बर्गावर्गी अंदाजपत्रकात विशेष तरतद करावी अशी मागणी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड यांना केली ऐतिहासिक भूमी असलेल्या सातारा जिल्हाच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अपेक्षित असलेल्या पर्यटन वाढ़ीकरीता, देशाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतृद करण्याबाबत योग्य काळजी घेतली जाईल असे स्पष्ट मत याप्रसंगी ना भागवत कराड यांनी व्यक्त केले आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे केंद्राचे अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड यांची आवर्जन भेट घेतली. त्याकवेळी सातारा जिल्ह्याची जडणघडण, ऐतिहासिक वारसा,जागतिक वारसास्थळे, ख्यातकिर्त थंड
हवेची ठिक्णांसह अन्य ठिकाणे, आध्यात्मिक केंद्रे अश्या विविध ठिकाणच्या शाश्वत विकासाबाबत दोहोंमध्ये सुमारे दिड तास चर्चा झाली. त्यानंतर दिलेल्या पत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे की.सातारा कास पठार, कास धरण परिसर, पेट्री गहा, बामणोली, वासोटा किल्ला, तापोळा, महाबळेश्वर, पांचगणी, क्षेत्रमहाबळेश्वर, ठोसेघर धवधबा, चाळकेवाडी, भांबवली गावातील वजराई धबधबा, अजिक्यतारा किल्ला, सज्जनगड,प्रतापगड, तीर्थक्षेत्र वाई, यवतेश्वर, पाटेश्वर, गोंदवले, चाफळ अरशी आणखी बरीच ठिकाणे, आजरोजी त्यांच्यामध्येअसलेले पर्यटनात्मक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक-सांस्कृतिक वैभवामुळे महत्व टिकवून आहेत. बहुतांशी ठिकारणी पायाभुत सुविधा उपलब्ध नाहीत किंवा फार कमी प्रमाणात आहेत. या परिसरांचा नियोजनबंध्द विकारस झाल्यास, येथील स्थानिक नागरीकांना जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळणार आहे. मोठी-मोठी धरणे आहेत, याठिकाणी जलचर जीवांची योग्य ती दक्षता घेबून, जलपर्यटन सुरु झाले तर ते सातारच्या विकासाचे सवर्धन ठरणार आहे.

पर्यावरणाचे सरक्षण राखत, किबहना पर्यावरणाचा समतोल राखत सातारकराच्या उज्वल भवितव्यासाठी या आणि अश्या प्रत्येक ठिकाणांच्या पायाभूत सुविधांसह समृध्द विकासाचे संकल्पचित्र या विषयातील अधिकारी व्यक्तींच्या माध्यमातुन आमच्याकडे तयार आहे. सातारचे ऐतिहासिक महत्व आणि पर्यटनाच्या द्रष्टीने सातारला असलेला मोठा वाव लक्षात घेवून, भावी पिढीच्या उज्वल भविष्याकरीता, आम्ही सुचवित असलेल्या नियोजित कामांना विशेष निधी आवश्यक आहे. याकरीता देशाच्या अर्थसकल्पात या कामांच्या विकासाकरीता पहिल्या वर्षाकरीता किमान १५०० कोर्टीची तरत्द करण्यात यावी. ही विकासकामांची ठिकाणे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच काही वन विभागाच्या हृदुदीत येत आहेत. त्यामुळे अंमलबजावणीत सुस्त्रता येण्यासाठी आणि प्रकल्पगतीमध्ये सातत्य राहणेकरीता सातारा पर्यटन विकासाचे स्वतंत्प्रधिकरण/कार्यकारी मंडळ स्थापन करुन त्या माध्यमातून विकास कामे राबिली जावीत अशी आमची आग्रही मागणी आहे
असेही यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.पर्यटन विकासाच्या माध्यमातुन सर्वागिण विकासाचा आपला दृष्टीकोन आणि धोरणात्मक नियोजन निश्चितचउल्लेखनिय असल्याने त्यास सर्वाची साथ मिळेल अशी शुभकामना व्यक्त करुनआपल्या योजना मार्गी लावण्यासाठी देशाच्या अर्थसिंकल्पात योग्य ती तरतुद करु असे ना. भागवत कराड यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे खा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकात शेवटी नमूद केले आहे.

Adv