अजितदादांनी घेतले पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचे दर्शन

530
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Adv

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी अनेक देव व देवींचे दर्शन केले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर होते यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील विविध देव देवीचे दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली सातारा कडे प्रस्थान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचे दर्शन घेतले व कार्यकर्त्यांनी बोललेला नवस पूर्ण केला

माळेगाव येथील काही कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा एक लाख मतांच्या फरकांनी निवडून यावे व हा नवस फेडण्यासाठी अजित दादांना आम्ही घेऊन येऊ असा नवस केला होता बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित दादा एक लाखाचे वर निवडून आले अजितदादा आज स्वतः हा नवस पूर्ण करण्यासाठी पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरात दुपारी 12.15 वाजता उपस्थित होते यावेळी ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले

जिल्ह्यात आपला दौरा असला काही मंत्री महोदय यांना पोलीस फाटा सायरन शाही सोहळा लागतो मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्री आहोत याचा कोणताही गर्व नसून सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे कोणताही सायरन व फौज फाटा न घेता आपला खाजगी दौरा केला दादांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांची मने जिंकली

Adv