Thursday, September 10, 2026
spot_img
Home Satara District पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

169
Adv

खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये याकरीता कोल्हापूर बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिनियम कल 33 (1) (ब) नुसार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत.

सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.

Adv