
उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर माजी खासदार रणजीत निंबाळकर यांच्या तक्रारीचा कार्यकर्त्यांनी जणू पाढा वाचला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही वेगळा विचार करूअशी स्पष्ट भूमिका फलटण येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडली
फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ed ची भीती दाखवणे तुमच्या संस्था, बँका अडचणीत येतील भाजपमध्ये प्रवेश करा हे थांबेल फक्त तुमी फलटण येथील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा अशी भीती येथील भाजप नेते रणजीत निंबाळकर दाखवत असून त्यावर राष्ट्रवादी पक्षांनी योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही वेगळी चूल मांडू असा स्पष्ट इशाराकार्यकर्त्यांनी दिला
महायुतीत सामील होण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतला होता कोणावरही अन्याय होणार नाही वेळप्रसंगी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन असा शब्द श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह कार्यकर्त्यांना दिला
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही हे प्रकरण खूप गंभीर असून मुंबईमध्ये बसून तोडगा काढू अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी छातीवर हात ठेवला की एखाद्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजा अशी खोचक टीका नाव न घेता सुनिल तटकरे यांनी विरोधकांवर केली





