Thursday, April 30, 2026
spot_img
Home Satara District Satara City पाणीपुरवठा विभागांमधील मुंगळ्या ची थेट पुणे येथे नेत्यांकडे झाली होती तक्रार

पाणीपुरवठा विभागांमधील मुंगळ्या ची थेट पुणे येथे नेत्यांकडे झाली होती तक्रार

137
Adv

सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी माजी पाणीपुरवठा सभापती यांना आदेश दिले होते की पाणीपुरवठा विभागातील मुंगळा पाणी पुरवठा विभागात नको त्यानंतर त्याची उचलबांगडी झाली होती मात्र पुन्हा विद्यमान पाणीपुरवठा सभापती यांनी त्या मुंगळ्याला पाणीपुरवठा विभागात आणल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला

तत्कालीन माजी सभापती यांनी पाणीपुरवठा विभागातील मुंगळयाची तक्रार थेट पुण्यात जाऊन आघाडीचे नेते यांच्याकडे केली होती तत्कालीन सभापती हे चांगले काम करत होते मात्र हा मुंगळा त्यांना कुठलाही प्रतिसाद देत नव्हता

तसा पाणीपुरवठा विभाग हा अत्यंत नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय त्या कामातच या मुंगळ्याने दिरंगाई केली त्यामुळे संबंधित सभापती व मुंगळयाची तू तू मै मै रोज होत होती ऐवढ्या तक्रारी झाल्याने सत्ताधारी आघाडीचे नेते यांनी त्या मुंगळ्याची बदली करा असे आदेश तत्कालीन सभापती यांना दिले होते त्या मुंगळ्याची उचलबांगडी झाली होती सभापतींचा बदल झाल्यानंतर तो मुंगळा पुन्हा पाणी पुरवठा विभागात येऊन चिकटला नंतर तो पाणी कमी आणि तरररर पणे वावरू लागल्याने यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसून येते

क्रमश

Adv