केंद्रसरकारच्या सूचनेनुसार, ज्यांना मधुमेह, हदयरोग, रक्तदाबासारखे गभीर आजार आहेत अश्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरीक आणि जेष्ठ नागरिक यांच्याकरीता नगरपरिषदेच्या पुज्य कस्तुरबा रुग्णालयात आणि गोडोली येथील (कै.) दादामहाराज आरोग्य केंद्रामध्ये कोव्हिड 19 वरील देण्यात येणारी लस मोफत स्वरुपांत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोफत लसीचा लाभ सर्व संबंधीतानी घ्यावा, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
कोविड 19 या संसर्गजन्य रोगावरील नागरीकांना देण्यात येेणारी लस केंद्र सरकारच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांसाठी मांफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या नागरीकांना मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार आहेत. अश्या 45 वर्षे वयापेक्षा जास्त वय असणार्या नागरीकांनाही सदरची लस मोफत देण्यात येणार आहे. सातार्यात नगरपरिषदेच्या पुज्य कस्तुरबा रुग्णालय, आणि नगरपरिषदेचे गोडोली येथील (कै.) प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज आरोग्य केंद्र या दोन नागरीकांना आधारकार्डाचा पुरावा ग्राहय ठरवण्यात येवून, या ठिकाणी मोफत लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोराना या रोगावर अद्यापपर्यंत तरी जालिम शास्त्रीय उपचार उपलब्ध नसल्याने, कोरोना लस घेणे हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आजमितीस आहे. असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आवाहन केले आहे.
सदरची लस सुरक्षित असून, आजपर्यंत ग्राउंडलेव्हलला काम करणार्या आरोग्यसेवक, शासकीय कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी घेतलेली आहे. स्वतः जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखिल लस घेवून, लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला असल्याने, केंद्राच्या सूचनांनुसार या दोन केंद्रामधून मोफत लस उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाचा जेष्ठ नागरीक आणि सर्व संबंधीतांनी लाभ घ्यावा. स्वतःच्या आधारकार्डासह सदर केंद्रावर जावून, संबंधीतांनी मोफत लस घेण्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती वजा आवाहनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.