मंत्री मकरंद आबांच्या त्या कोरेगावतील कार्यक्रमाने महायुतीत नाराजी?

556
Adv

(संदीप शिंदे )
कोरेगाव दि: आज मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करण्यापूर्वीच कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन झाले.या भूमिपूजनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला असला तरी पुनर्वसन व मदत मंत्री मकरंद पाटील यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा संदेश दिला.या संदेशाने महायुतीतील स्थानिक नेत्यांना संक्रातीचे तिळगुळ कडू लागल्याची चर्चा चांगलीच रंगू लागलेली आहे.

मंत्री पाटील यांच्या आजच्या भूमिकेमुळे कोरेगाव तालुक्यासह जिल्ह्यात नाराजी तर पसरलीच याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी अन्यथा महायुतीत संघर्ष होणार हे त्रिवार नक्की

सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच महायुतीचे आमदार निवडून आल्यामुळे एकदम चार जणांना मंत्रिपदाचे तिळगुळ मिळाले आहेत.आता पालकमंत्र्याची प्रतीक्षा अनेकांना लागलेली आहे. यावेळची मकर संक्रात चांगलीच गोड झालेली आहे. परंतु कोरेगाव येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात महायुतीतील काही नेत्यांनाच आता हे तिळगुळ कडू लागत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे. अजून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ठरले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला आघाडीच्या नेत्यांना मदत व महायुतीतील कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे ऐवजी त्यांना बाजूला ढकलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या मकर संक्रांतीचे कडू झालेले तिळगुळ स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांना पचणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता सातारा जिल्ह्याबाबत उलटे धोरण करावे. ते म्हणजे फणस बाहेरून जरी काटेरी असला तरी आता गोड असतो. आता त्याच्या उलट बाहेरून गोड व आतून कडू कारल्यासाठी कडू असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी होऊ लागलेली आहे. तरच महायुतीला न्याय मिळेल असं मानण्यात येत आहे

सातारा जिल्ह्यात लोकसभेसह महायुतीला विधानसभेत चांगले यश मिळाले या यशानंतर मंत्रिमंडळातही जिल्ह्याला चांगला वाटा मिळाला मात्र आज झालेल्या कोरेगावातील त्या कार्यक्रमा मुळे मंत्री मकरंद पाटील यांच्यावर जिल्ह्यातील महायुतीतील कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळाली

महायुतीने सातारा जिल्ह्याला भरभरून दिले आमदार मकरंद पाटील नामदार झाले, महायुतीत आल्यानंतर त्यांना राज्यसभा, कारखान्याला 400 कोटी रुपये आधी सर्व पदांचा लाभ या कुटुंबाला मिळाला तो महायुती मुळेच मात्र आज कोरेगावातील त्या कार्यक्रमामुळे मंत्री मकरंद पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात भविष्यात महायुतीत खदखद होणार हे मात्र नक्की अशी चर्चा तिन्ही पक्षातील कार्यकर्ते करत आहेत

एखादी व्यक्ती मंत्री झाल्यावर सर्वसामान्य जनतेची असते मात्र ज्या आमदार शशिकांत शिंदेंनी लोकसभा विधानसभा महायुतीच्या विरुद्ध लढवली ऐन निवडणुकीच्या काळात महायुतीच्या राज्यातील नेत्यांवर टीका टिपणी केली त्यांच्या कार्यक्रमाला मंत्री मकरंद पाटील यांनी हजेरी लावल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली असल्याचे एक प्रकारे स्पष्ट दिसत आहे

सातारा जिल्ह्यात महायुतीला यश मिळाल्यानंतर महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांची संख्या हे विद्यमान मंत्री मकरंद पाटील यांच्या अवतीभवती असताना दिसते मग कॉन्ट्रॅक्टर असो ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद माजी सदस्य असो अथवा जिल्हा बँकेचा माजी संचालक हे सर्व मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या अवतीभवती फिरत असताना दिसतात ज्या महायुतीमुळे खंडाळा आणि किसनवीर कारखाना वाचला त्यांच्याविरुद्ध प्रचार करणाऱ्यांच्या बरोबर मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांची सलगी वाढल्याने महायुतीतील नेत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Adv