माढा मतदारसंघात तुतारीचा बोलबाला. आतुरता राम आदेशाची

1212
Adv

महाराष्ट्रात माढा मतदार संघातील उमेदवारावरून बरेच फलटण ते अकलूज रामायण घडले मात्र महायुतीने उमेदवार बदलला नसल्याने अकलूज ते फलटण येथील दिग्गज मान्यवर येत्या दोन-तीन दिवसात तुतारी हाती घेणार असल्याचे खात्री वृत्त आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली मात्र या उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यासह बऱ्याच मतदारसंघातील नेत्यांनी या उमेदवाराला विरोध केला उमेदवार बदलावा म्हणून जाहीर मेळावे ही झाले मात्र उमेदवार बदलला गेला नसल्याने अकलूज ते फलटणकर राम आदेशाची वाट बघत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अकलूज ते फलटण येथील दिग्गज मान्यवर येत्या दोन-तीन दिवसात तूतारी हाती घेऊन भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याचा चंग बांधणार असल्याचे दिसून येते

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे तगडा उमेदवार दिला गेला तर विद्यमान खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ही निवडणूक जड जाणार हे चित्र स्पष्ट असून विकास केला असा डांगोरा पिटणाऱ्या विद्यमान खासदारांनी काही गावात पाच वर्षात फिरकलेही नसल्याची तक्रार माढा मतदारसंघातील नागरिक करत आहेत याउलट विजयदादाच आमचे खासदार म्हणून आम्हाला माढा मतदारसंघात आठवतात इतर कोणताही खासदार आम्हाला आठवत नसून येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पिलिवचा घाट दाखवणार असल्याचे मतदारांनी खाजगीत सांगितले

Adv