आमदार जयकुमार गोरे यांच्या अर्जावर ३0 रोजी सुनावणी

467
Adv

मायणी ता. खटाव येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीनाचा अर्ज वडूज येथील सत्र न्यायालया ऐवजी अन्य न्यायालयात चालवण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आला आहे. यावर आता दि. ३0 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे विरळी, ता. माण, महेश पोपट बोराटे बिदाल, ता. माण व अज्ञात दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी संजय काटकर याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी आ.गोरे यांनी वडूज न्यायालयात अर्ज केला. मात्र, या अर्जावरील सुनावणी अन्य न्यायालयात व्हावी, यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतल्यामुळे आता सुनावणीसाठी दि. ३0 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.

Adv