आमदारकिचा राजीनामा द्या रणजीत मोहिते पाटलांना आदेश?

594
Adv

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा शड्डू ठोकल्याने त्यांचेच घरातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा भाजपच्या उमेदवाराचे काम करा असा स्पष्ट संदेश दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असून भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील कुठेच भाजप उमेदवाराचा प्रचार करताना दिसत नसल्याने पक्षाकडून त्यांना राजीनामा द्या अशा सूचना आली असल्याची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघात रंगू लागली आहे नक्की राजीनामा देण्याच्या आदेश आला की नाही कळाले नसून येत्या दोन दिवसात याचे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे

तुतारी या चिन्हावर धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतरच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्या अशा सक्त सूचना दिल्या गेल्याची चर्चा जोर धरू लागली आहे येत्या दोन दिवसात रणजीत सिंह मोहिते पाटील राजीनामा देणार की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Adv