लोकसभेच्या अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड उत्तर चा दौरा केल्याने भाजप नेत्याचे मनोधैर्य वाढले असल्याचे काल दिसून आले
कराड उत्तर मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विविध गाठीभेटी घेत महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली या भेटीगाठी मुळे कदम कदम बढाये जात मनोधैर्य चांगलेच वाढले असल्याचे दिसून आले छत्रपती उदयनराजे भोसले यांना कराड उत्तर मधून सर्वात जास्त मताधिक्य देणार असल्याचाही निर्धार कराड उत्तर मधील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केला आहे
एकंदरच कराड उत्तराच्या दौऱ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या कुटुंबीयांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या औक्षण करत स्वागत केले यावेळी विविध विषयांवर जिल्हाध्यक्षांच्या घरी चर्चा झाली धैर्यशील कदम व माझी 30 वर्षांपूर्वीची मैत्री असल्याचे आवर्जून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले