जावळीतील गावकर्‍यांना पाणी मिळण्यासाठी आ शशिकांत शिंदे यांनी घेतली अधिकाऱ्यांसमवेत बैठक

358
Adv

जावळी तालुक्यातील ‘करंदी’, इंदवली, रानगेघर यागावातील विविध प्रश्न, पाणीपुरवठा योजना, धरणासंबंधी असलेले प्रश्न सोडवण्यासाठी तहसील ऑफिसचे अधिकारी, पाणी पुरवठा योजनेसबंधी कार्यालयातील अधिकारी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेतली.

यामध्ये या तिन्ही गावांसाठी नवीन पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित करून त्या तात्काळ मंजूर करणे तसेच कुडाळ येथील बौद्धवस्ती व मातंगवस्ती याठिकाणी पाण्याची टाकी बांधण्याच्या सूचना जावळी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यासह जावळी तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्ध शेत पानंदरस्ते योजनेमधून जावळी तालुक्यातील जरेवाडी, रानगेघर, इंदवली, करंदी याठिकाणी असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या. जरेवाडी, हुंमगाव, करंदी, रानगेघर रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून प्रस्तावित करण्याच्या सूचना या योजनेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

याठिकाणी बांधण्यात आलेल्या महू-हातेघर धरणाच्या कॅनॉल कामामुळे करंदी, रानगेघर, इंदवली गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे, बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनींवर मातीचे ठीग आहेत. त्या जमिनीचे सपाटीकरण व शेतीसाठी वापर करण्यासाठी तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. आठच दिवसात हे काम पूर्ण होईल, हा शब्द कॅनॉलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिला. याचबरोबर रांजनेघर येथील धरण कामांसंदर्भात सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकारी वर्गास केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी त्याविषयी सर्वेक्षण करू हा शब्द दिला.

या बैठकीसाठी तहसील कार्यालयातील श्री.मनोज इंगवले, धरणाचे उपअभियंता श्री. जयवंत बर्गे, श्री.अजय अवताडे, महू हातेघर उपअभियंता श्री विजय गीतांबे, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Adv