Sunday, April 26, 2026
spot_img
Home Satara District Satara City नगरसेवक शेखर मोरे पाटलांना गुडगुडी बाबाचा कोलदांडा

नगरसेवक शेखर मोरे पाटलांना गुडगुडी बाबाचा कोलदांडा

179
Adv

नगर विकास आघाडीचे नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून या गुडगुडी बाबाने प्रभागात येतो असे सांगून फसवत असल्याची घटना नुकतीच घडली आहे

नगरसेवक शेखर मोरे पाटील हे गोडोली चे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत पावसाळा तोंडावर आला आहे यांच्या पार्श्वभूमीवर ओढे-नाले पाहून साफ करण्यासाठी गुडगुडी बाबाला गेल्या तीन दिवसांपासून नगरसेवक मोरे पाटील पाठपुरावा करत होते मात्र त्यांना कसलीही दाद या गुडगुडी बाबाने दिली नाही एवढी मस्ती या गुडगुडी बाबाची कशी वाढली याचा अनुभव खुद्द नगरसेवक शेखर मोरे पाटील यांना सुद्धा आला

गुडगुडी बाबाला मुख्याधिकारी यांचा आशीर्वाद असल्याने आपण काही करु शकतो असेच वाटू लागले आहे आपण एका राजकीय वजनदार असलेल्या मंत्र्यांबरोबर असून आपले कोणीच काही करू शकणार नाही अशा अविर्भावात हा गुडगुडी बाबा आजही पालिकेत वावरत असल्याचे चित्र आहे

गोडोली येथे सलग दोन वर्ष पूर परिस्थिती निर्माण झाली होती याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरसेवक शेखर मोरे पाटील ओढे-नाले साफ करण्यासाठी पाठपुरवठा करत होते मात्र दस्तुरखुद्द त्या गुडगुडी बाबांनेच त्याला कोलदांडा दिला गुडगुडी बाबा किती नागरिकांच्या जीवाशी खेळतोय त्याचा अनुभवी नगरसेवक मोरे पाटील यांना आला असून याचा जाब सभागृहात मी नक्कीच विचारणार असल्याचे ठाम मत मोरे पाटील यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

Adv