Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District आमच्याकडे जनावरे नाहीत आम्हाला घोडा लावून तरी काय उपयोग आ महेश शिंदे...

आमच्याकडे जनावरे नाहीत आम्हाला घोडा लावून तरी काय उपयोग आ महेश शिंदे यांची टीका

591
Adv

आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत मी बऱ्याच जणांना घोडा लावणार असल्याचे वक्तव्य केले होते त्यावर आता आमदार महेश शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे

किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत दोन दिवसापूर्वी विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी भर सभेत वक्तव्य केले होते की इथून पुढे मला घोडा लावायचा आहे काही लोकांना असं वाटत की आपण आता जिल्हा हातात घेऊ शकतो अशी टीका आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता केली होती या वक्तव्याला आमदार महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे की तुम्हाला घोडा लावायचा असेल तर संस्थानिक पंतप्रतिनिधी ( औ ं ध) करांना लावा असा रोष त्यांच्या भाषणात दिसून आला

आमदार शशिकांत शिंदे निवडणुकीत ज्यांच्या बाजूने असतात तिथे त्यांचा पराभव ठरलेला असतो असे वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केले आहे आमच्याकडे जनावरे नाहीत आम्हाला घोडा लावून तरी काय उपयोग आम्ही शेतकरी असून आमच्याकडे गाई म्हशी बैल आहेत घोडा हा संस्थानिक व पंतप्रतिनिधी यांच्या कडेच असतो त्यामुळे लावायचा असेल तर त्यांनाच लावा असे वक्तव्य महेश शिंदे यांनी भर सभेमध्ये केले आहे

Adv