सातारा जिल्हा बँक ‘बँको ब्ल्यु रिबन २०२१ ’पुरस्काराने सन्मानित

325
Adv

अविज पब्लीकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा प्रा. लि., पुणे यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून ‘बँको ब्ल्यु रिबन २०२१ ’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लोणावळा येथे मान्यवरांचे उपस्थितीमध्ये प्रदान करणेत आला.
तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार सातारा जिल्हा बँकेस या पुरस्काराने सन्मानित केले. बँको, देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मुल्यमापन बँकोचे ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूणच उत्कृष्ठ कामकाज आणि रुपये ७५०० कोटीचे वर ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेस प्रथम क्रमांकाचे पुरस्काराने सन्मानित करणेत आले.
सदर पुरस्कार अविज पब्लीकेशनचे मुख्य संपादक श्री. अविनाश शिंत्रे गुंडाळे, गॅलेक्सी इन्माचे संचालक श्री. अशोक नाईक यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक श्री. डी जी काळे यांचे हस्ते बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे तसेच बँकेचे संचालक श्री. रामराव लेंभे, श्री. सुनील खत्री, श्री. ज्ञानदेव रांजणे, सौ. ऋतुजा पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, उपव्यवस्थापक श्री. संदीप शिंदे, अधीक्षक श्री. विश्वजित राजूरकर, श्री. प्रदीप बारटक्के, श्री. अनिल फाळके, श्री. अमोल गुजर, श्री. तानाजी जानुगडे यांचे समवेत पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बँकेस सन २०१३ पासून २०२० पर्यंत ‘बेस्ट परफॉर्मन्स’ व ‘बेस्ट टेक्नॉलॉजी’ ‘बेस्ट आय टी सेंटर, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
श्री. डी. जी. काळे यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख केला. बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामकाजाची प्रशंसा केली. सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सातारा जिल्हा बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सेवा त्वरित उपलब्ध होणेसाठी व स्पर्धात्मक युगामध्ये राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या बरोबरीने गुणात्मक व तत्पर डिजिटल सेवा ग्राहकांना उपलब्ध केलेने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटकापर्यंत बँक प्रभावी कामकाज करीत आहे. या पुरस्काराबद्दल श्री. काळे यांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँकेने या पुरस्काराबरोबर १०० पुरस्कारांची बाजी मारली आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये बँकोच्या माध्यमातून पुरस्कारांची शतकपुर्ती केली आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार, उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, ‘शून्य’ टक्के निव्वळ एन. पी. ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला आहे.
संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. श्री. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेला उत्कृष्ठ कामकाजाबद्दल नाबार्डचे सात व इतर नामांकित संस्थांचे पुरस्कार मिळालेले असून आजच्या पुरस्काराने बँकेने पुरस्कारांचे शतक केले आहे. आपल्या बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे .
पुरस्कार मिळालेबद्दल बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन पाटील म्हणाले, बँकेने सर्वसामान्य शेतक-याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेने राखलेला शुन्य टक्के एन .पी .ए ., १००% कर्जवसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आर .बी .आय . चे नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत. बँकेने सी .बी .एस .प्रणाली, मोबाईल बँकिंग, किसान पे अॅप, भिम अॅप ग्राहकांना देवून क्रांती केली आहे.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे. बँकेने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बँकेच्या मा. संचालक मंडळाने १ मे २०२२ पासून बँकेमार्फत पुरवठा होत असलेल्या सर्व कर्जाच्या व्याज दरात ०.५० ते २.०० % एवढी कपात केली असून सर्व ग्राहकांनी लाभ घेणेचे आवाहन यावेळी त्यांनी केले

Adv