आमदार आनंदराव पाटील भाजपच्या गोटात? चंद्रकांत दादांचे केले स्वागत

519
Adv

आज कराड येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी मा.आ.आनंदराव पाटील ( नाना), य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले ( बाबा ), व इतर मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसच्या गोटातून आमदार झालेले सातारा जिल्ह्याचे माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत केले यावेळी भाजपचे युवा नेते अतुल बाबा उपस्थित होते आमदार आनंदराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वागत केल्याने ते भाजपच्या गोटात सामील झाले असल्याचे बोलले जाते आमदार आनंदराव नाना भाजपच्या गोटात सामील झाले की नाही हे येणाऱ्या काळात नक्कीच कळेल जर ते भाजपमध्ये सामील झाले असतील तर याचा फायदाच कराड शहर व कराड दक्षिण मतदार संघातील येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व त्यानंतर विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला होणार असल्याचे एकूण दिसून येते

आमदार आनंदराव पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून बरेच वर्ष काम केले जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क असून ते भाजपमध्ये आल्यास याचा जिल्ह्यातील भाजपाला अधिक फायदा होईल असे काही राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे मात्र आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे आमदार आनंदराव पाटील यांनी स्वागत केल्याने बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील

Adv