Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City भाजपच्या नगरसेवकांना हवय सातारच्या पालिकेत सभापतिपद

भाजपच्या नगरसेवकांना हवय सातारच्या पालिकेत सभापतिपद

161
Adv

नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या मूळ नगरसेवकांना आपल्याला सभापतीपद मिळावे अशी अपेक्षा आहे

सातारा पालिकेच्या निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी व भाजपा अशी तिरंगी लढत झाली होती सातारा विकास आघाडीचे 23 नगरविकास आघाडीचे 12व भाजप चे सहा असे संख्याबळ सातारा पालिकेत असून सातारच्या दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपा पक्षातर्फे निवडणूका लढवल्या आहेत येणाऱ्या महिन्याभरात सातारा पालिकेच्या सभापती निवडी होणार असून भाजपच्या मूळ नगरसेवकांनी सभापतिपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधल्याचे दिसून येते हे सभापती पद त्यांना मिळणार का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे

सातारानामशी बोलताना भाजपचे नगरसेवक म्हणाले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे व भाजपचे नेते असून त्यांच्याकडून आम्हाला सभापतीपद नक्की मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

Adv