राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सातारा भेटीचे आमंत्रण

270
Adv

साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले . आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी उदयनराजे यांनी मुर्मू यांना सातारा भेटीचे आमंत्रण दिले छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला मी अवश्य भेट देईल असे आश्वासन मुर्मू यांनी उदयनराजे यांना दिले

भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मूर्मू यांची निवड झाली आहे भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आदिवासी महिला म्हणून निवडल्या गेल्या आहेत . साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींची शनिवारी भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे एक प्रतीक असणारी राजमुद्रा व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींचा सन्मान केला

यावेळी महामहीम राष्ट्रपती यांना साताऱ्याचा ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा सांगितला साताऱ्याच्या छत्रपती घराण्याने देशाच्या वाटचालीमध्ये मोठे योगदान दिले आहे विशेषतः मुलींचे शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याला मी अवश्य भेट देईन असे आश्वासन राष्ट्रपतींनी उदयनराजे यांना आश्वासन दिले

Adv