Monday, April 20, 2026
spot_img
Home Maharashtra काम न करणाऱ्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचे पुनर्वसन करा

काम न करणाऱ्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचे पुनर्वसन करा

648
Adv

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून मकरंद पाटील यांच्याकडे जबाबदारी असून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आता मकरंद आबाच प्रमुख असल्याने जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीच्या कानिपिचक्या द्याव्यात अशी हाक सर्वसामान्य कार्यकर्ता मारत आहे

मागच्या जिल्हाध्यक्षांनी काय काम केले याचा लेखाजोखा राष्ट्रवादी कार्यालयात आहेच मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी स्वतः अजितदादा असल्याचा अविर्भाव आणून वागत असल्याने नक्की जिल्हाध्यक्ष व पदाधिकांनी काय काम याचाच त्यांना विसर पडल्याचे दिसून येते राष्ट्रवादी पक्षात मागणे येऊन लक्ष्मी दर्शन कमवण्यात काहींचा पुढाकार आहे याची सर्व कानकून निवास करणाऱ्यांना आहे मग हेही यात सामील आहेत की काय अशी शंका उपस्थित होते

मंत्री मकरंद पाटील हे स्वच्छ व पारदर्शी कारभार करणारे नेतृत्व आहे मात्र विनाकारण राष्ट्रवादी सहकारखान्याच्या काही परिसरात निवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने सबकुछ शिं….दे शाही अशीच परिस्थिती दिसत असल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये ही नाराजीचे सूर पसरत आहे त्यामुळे अशा विनाकारण निवास करणाऱ्यांचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पुनर्वसन करावे चर्चा या मतदारसंघात रंगते

काही पदाधिकाऱ्यांना बाजार समितीचा प्रचंड अनुभव असून ( लक्ष्मी दर्शनाचा नव्हे) अशा पद्धतीच्या हातात दादांच्या घड्याळाचे काटे दिल्याने इतर लोकांना कोणत्याही नेत्यांजवळ केल्यावर ते कसे टोचायचे बाजार समितीत कांदा बटाटा यांचा लिलाव कसा होतो तसा करून आपली घर भरायची आशा अनुभवाचे काही राष्ट्रीय नेते येथे असल्याने पक्ष नक्कीच वाढताना टिकटिक करणार हे मात्र नक्की

Adv