Saturday, April 25, 2026
spot_img
Home Maharashtra आम्ही सत्ता स्थापन करणार नाही – अजित पवार

आम्ही सत्ता स्थापन करणार नाही – अजित पवार

157
Adv

आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने विरोधी पक्षात बसण्याच्या कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करण्याच्या फंद्यात पडणार नाही. आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. याआधीही आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहोत, असं अजित पवार म्हणाले

राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.महायुतीत मुख्यमंत्री पदावरून तेढ निर्माण झाली आहे.त्यातच राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करणार असल्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत.

Adv