विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर

446
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Adv

३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी गडकिल्यावर विशेष पोलीस बंदबोस्त ठेवावा असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे देण्यात आले तसेच किल्ले अजिंक्यतारा च्या पायथ्याला कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारावी सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा यांच्या मार्फत मा.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांना करण्यात आली

किल्ले अजिंक्यतारावरती अनेक गैरप्रकार होतअसून स्वच्छता मोहीम दरम्यान अनेक दारूच्या मोकळ्या बाटल्या आक्षेपार्ह वस्तु आढळल्याचे एस पी साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यात आले यावर लवकरच शिवप्रेमी सातारा नगरपालिका आणि पोलिस अधिकारी यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन किल्ले अजिंक्यतारा च्या पायथ्याला पालिके कडून जागा उपलब्ध करून दिल्यास कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्या संदर्भात प्रतिष्ठानच्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेवुन लवकरच पोलिस चौकी ऊभी केली जाईल असे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी सांगितले.

सातारा जिल्हा हा ऐतिहासिक तसेच मराठ्यांची राजधानी म्हणून संपुर्ण भारतात ओळखला जातो या जिल्ह्य़ात अनेक गड असुन ते छत्रपती शिवाजीमहाराज धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती शाहु महाराज थोरले यांच्या पराक्रमाचे साक्ष देत आजही दिमाखात ऊभे आहेत.अश्या गडकिल्ल्यांवर ३१ डिसेंबर साजरा करणेसाठी काही अपप्रवृत्तीं कडून दारू पिणे पार्टी करणे गडावर दारूच्या बाटल्या फोडणे व गडाचे नुकसान करणे हे घाणेरडे प्रकार केले जातात व गडाचे पावित्र्य राखले जात नाही.

नुकतेच राज्य शासनाने याबाबतीत गड किल्ल्यांवर दारू पिताना आढळल्यास तातडीने अटक व एक लाख रूपये दंड होणार असा कायदा केला आहे याची कडक अंमलबजावणी आपल्या मार्फत केली जावी याबाबत आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आपणास विनंती करत आहोत.सदर प्रकाराबाबत आपण स्वताः जातीने लक्ष घालुन दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी आपल्या मार्फत किल्ले अजिंक्यतारा सज्जनगड, प्रतापगड, वासोटा, व जिल्ह्य़ातील सर्वच गडांच्या मार्गावर तसेच गडावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, याने सदर प्रकारांना आळा बसेल अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकर्यांकडून असले प्रकार गडावर करताना आढळल्यास त्यांना चोप देण्यात येईल व तोंडास काळे फासण्यात येईल यानंतर कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असे निवेदन देण्यात आले- त्यास समीर शेख साहेबानी सकारत्मक प्रतिसाद देत पोलीस बंदोबस्त संपूर्ण जिल्हा मधील गडकिल्या वर लावण्यात येईल असे सांगण्यात आले.

Adv