शाहूनगर मधिल नागरिकांचे मणके सुस्थितीत राहण्यासाठी जय सोशल फाऊंडेशन चे मुख्याधिकारी याना निवेदन

211
Adv

शाहूनगर मधिल युनायटेड वेस्टर्न कॉलनी ते जगतापवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जय सोशल फाउंडेशनच्या वतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे करण्यात आली आहे

या निवेदनात नमूद आहे की एसटी कॉलनी ते जगताप वाडी हा रस्ता शाहूनगर मधील मुख्य रास्ता आहे या रस्त्यावरून गुरुकुल स्कुल ,पेरेन्ट्स स्कुल,रामराव, पवार नगर,गोळीबार मैदान तसेच संपूर्ण शाहूनगरमधिल रहिवासी ये जा करत असतात.दररोज या रस्त्यावरून किमान 2000 गाड्या जातात.रस्ता खराब असल्याने नागरिकांचे मणके सरकने,अपघात होऊन दुखापत होणे तर जेष्ठ नागरिकांना निट चालता सुद्धा येत नाही तरी हा रस्ता तातडीने करण्यात यावा असे निवेदनात नमूद आहे . लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन बापट साहेब यांनी दिले यावेळी जय सोशल फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सतीश यादव खजिनदार संजय खुडे ,संकेत खर्शिकर गणेश जाधव उपस्थित होते

Adv