Saturday, September 5, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यात अवकाळी पावसाचा जोरदार धुमाकूळ.

साताऱ्यात अवकाळी पावसाचा जोरदार धुमाकूळ.

271
Adv

गेले चार दिवस रणरणत्या उन्हात अन झालेल्या सातारकरांना आज शुक्रवारी दुपरी असहाय्य केले. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने सातारकरांच्या जीवाची अजूनच तगमग वाढली .दुपारी सव्वा चार नंतर सातारा शहर परिसरावर काळया ढगांची दाटी होते अक्षरशा परिसर अंधारून गेला आणि साडेचार वाजता जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली. वेगवान वारे जोराने आवाज मेघगर्जनेसह झालेला अवकाळी पाऊस सातारकरांना खरोखरच थंडावा देणारा ठरत आहे. त्यातच जोराच्या सरींवर सरी मुळे पवई नाका परिसरात रस्त्यातून वाहणारे पाण्याचे लोंढे रस्ता धुऊन काढत होते.या पावसाचा जोर एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की रस्त्यातून ये-जा करणाऱ्या सर्व वाहन चालकांना अक्षरशः वाहनाचे दिवे लावूनच मार्गक्रमण करावे लागत होते
.गेले तीन दिवस उकाड्याने हैराण झालेल्या सातारा परिसरातील नागरिकांना या पावसाने अक्षरशः गारेगार करून टाकले आहे .परिसरातील अनेक मोठ्या इमारतींवर ऊन हा जोरदार पावसाचा नजारा अनुभवण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी करत चिंब भिजत हा पहिला पाऊस अंगावर घेतला आणि या खेड्यातून थोडातरी सुटकारा मिळाल्याचा निश्वास सोडला.

Adv