सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतीत छ उदयनराजे व आ महेश शिंदे गटाचे वर्चस्व

302
Adv

सातारा तालुक्यातील पाच पैकी चार ग्रामपंचायतीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे

सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्राचे लक्ष लागले होते या निवडणुकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना धोबीपछाड देऊन राज्यात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे

गोजेगाव, संभाजीनगर व खिंडवाडी ग्रामपंचायती मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे एक हाती वर्चस्व सिद्ध झाले यांच्या यशात माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाने ताकतीने या ग्रामपंचायती एक हाती आपल्या ताब्यात घेतल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाचे सतीश माने हे तब्बल दोनशे मतांनी सरपंच पदी निवडून आले तर खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांचे सरपंच निवडून आले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या या निवडणुकीत मा. खा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले आणि कोरगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.महेशदादा शिंदे यांचे नेतृत्वाखालील सातारा तालुक्यातील संभाजीनगर, खेड आणि गोजेगाव ग्रामपंचायत उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. तसेच खा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांचे नेतृत्वाखालील सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत खिंडवाडी पॅनलने ८-३ अशी यशस्वी बाजी मारत भरघोस मतांनी यशस्वीरित्या विजय संपादन केला. सर्व यशस्वी उमेदवारांचे खा.श्रीमंत छ.उदयनराजे भोसले तसेच कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर (तात्या) यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले….!

Adv