पेढ्याच्या भैरोबा यात्रेनिमित्त रॅम्प कट्टा मित्र समूहातर्फे नटरंग नार लावण्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन

308
Adv

समस्त सातारकरांचे आराध्य दैवत असलेल्या पेढ्याच्या भैरोबाची यात्रा मंगळवारी दिनांक 19/4/2022 रोजी होत असून यात्रेनिमित्त खास नटरंगनार या ऑर्केस्ट्राचे रॅम्प कट्टा मित्र समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मित्र समूहाने यावेळी दिली

कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर प्रथमच पेढ्याच्या भैरोबाची यात्रा संपन्न होत असून या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत यात्रेचा मुख्य दिवस हा मंगळवारी असून या दिवशी पालखी छबिना व मिरवणूक संपन्न होणार आहे

दिनांक 22 रोजी युवा कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह भ प श्री ओंकार महाराज गुरव यांचे कीर्तन हि यात्रेनिमित्त आयोजित केले आहे दिनांक 23 रोजी सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी मंदिराजवळ रॅम्प कट्टा मित्र समूहातर्फे नटरंग नार हा ऑर्केस्ट्रा आयोजित केला असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही मित्र समूहाच्यावतीने करण्यात आले आहे

Adv