सातारा पालिकेला माझी वसुंधरा अभियान पुरस्कार जाहीर

278
Adv

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान २.० स्पर्धेत जिल्ह्यातील सातारा, कराड, नगरपालिकेसह दहिवडी नगरपंचायतीने चमकदार कामगिरी केली आहे. या तिन्ही नगरपालिकांच्या कामगिरीची दखल घेतली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा विशेष सन्मान सोहळा मुंबई येथे रविवार, दि. ५ जून रोजी होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थेची स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा ३९५ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व ३०४ ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबवण्यात आली. यामध्ये हरित कवच, जैवविविधता वाढवणे, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा निर्माण करणे, जलसंधारण, ऊर्जा स्वावलंबन, जनजागृती कार्यक्रम आणि पर्यावरण रक्षण, वायू, भूमी, जल, अग्नी, आकाश या पाच व्यापक निर्देशकांवर आधारित कार्यांचे मूल्यांकन करण्यात आले होते

ऑक्टोबर २०२० ते जानेवारी यादरम्यान या मूल्यांकनाचे नोंदी करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेअंतर्गत अमृत गटामध्ये सवार्ेत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये सातारा, नगरपालिका, कराड नगरपालिका आणि दहिवडी नगरपंचायतीचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळा रविवारी (दि. ५) सकाळी साडेदहा वाजता मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीए नरिमन पॉईंट येथे होणार आहे. सातारा नगरपालिकेचे प्रशासक अभिजित बापट या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. अभियानासंदर्भातील पत्र माझी वसुंधरा अभियानाचे अभियान संचालक सुधाकर बोबडे यांनी सातारा पालिकेला पाठवले आहे.

…………. चौकट………….

मान्याच्यावाडीचाही सन्मान

या स्पर्धेत ग्रामपंचायत गटामध्ये सवार्ेत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी मान्याच्यावाडीने प्रयत्न केले आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र माने हे सन्मान स्विकारण्यासाठी जाणार आहेत.

Adv