Saturday, September 12, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City राष्ट्रीय बॉक्सिंग सुवर्णपदक विजेती आर्या बारटक्के हिचा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

राष्ट्रीय बॉक्सिंग सुवर्णपदक विजेती आर्या बारटक्के हिचा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार

704
Adv

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याचा अभिमान युथ बॉक्सर आर्या देवेंद्र बारटक्के हिचा सत्कार.

चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक घेऊन सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला. मुख्यमंत्र्यांना हे समजताच त्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना बोलवून घेऊन मुंबई येथे त्यांचा सत्कार केला व पाठीवर शाबासकीचा हात ठेवून पुढील कारकीर्दीसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आर्याला शुभेच्छा दिल्या व लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि तसेच भविष्यामध्ये भारताला ऑलम्पिक मध्ये देखील सुवर्णपदक मिळवून आपल्या साताऱ्याचा अभिमान जागतिक स्तरावर वाढवण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.

सत्कार प्रसंगी साताऱ्या मधील मुख्यमंत्री साहेबांचे खंदे समर्थक निलेश मोरे तसेच आर्या बारटक्के हिचे मुख्य प्रशिक्षक अमित सागवान सर विजय कांबळे सागर जगताप आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमी माननीय अध्यक्ष श्री मंगेश जाधव सर उपाध्यक्ष देवेंद्र बारटक्के सर सचिव सचिन दीक्षित सर खजिनदार सुनील इंगवले सर आणि रमेश शिंगटे अभिजीत सपकाळ, संकेत नवघणे उपस्थित होते

Adv