मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ ( Congress leader Kamal Nath) यांनी राज्यातील जनतेला आणि पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख आपले सर्वांचे नेते अशा शब्दांत केला. त्याशिवाय, राहुल यांच्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्या पोस्टकडे नाथ यांनी पक्षबदलाच्या चर्चांना दिलेला पूर्णविराम म्हणून पाहिले जात आहे.
कॉंग्रेसला रामराम ठोकून नाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला. अर्थात, तसे घडणार नसल्याचा दावा सातत्याने कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी केला. मात्र, स्वत: नाथ यांनी कुठले भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी मोठा सस्पेन्स निर्माण झाला. अखेर सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून नाथ यांनी तो सस्पेन्स संपवला.
Home Politics|Satara District Satara City अखेर कमलनाथ यांनी चर्चांना दिला पूर्णविराम; म्हणाले, ‘राहुल गांधी आपले नेते’






