हिंदी चित्रपटांमध्ये समतेचा नारा देणारे गीत म्हणजे पानी रे पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिला दो लगे उस जैसा… याचीच सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील निरा नदीच्या तीरावर पाहण्यास मिळाले.या ठिकाणी जमलेल्या सर्व धर्माच्या कार्यकर्त्यांनी श्री छ खासदार उदयनराजे भोसले यांचे मनापासून स्वागत करून खऱ्या अर्थाने माणुसकीची रंगपंचमी साजरी केली.
सातारा शहरात ही छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जंगी स्वागत करण्यात आले शिवतीर्थ येथे फटाक्याच्या आतिश बाजीने शिवतीर्थ उजळले होते यावेळी त्यांच्याबरोबर छ सौ दमयंतीराजे भोसले,मनोजदादा घोरपडे धैर्यशील कदम आदी मान्यवर उपस्थित होते
सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवारी मिळावी.यासाठी श्री छ खा उदयनराजे भोसले व त्यांचे हितचिंतक यांनी दिल्लीमध्ये यशस्वी बोलणी केल्यानंतर सातारा या आपल्या हक्काच्या होम पिचवर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कष्टकरी,शेतकरी तसेच सर्वपक्षीय नारा देणारे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.भूमाता दिंडीतून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी निघालेली ही दिंडी आता विशिष्ट टप्प्यावर आलेली आहे.आज शिरवळ ते सातारा येथील शिवतिर्थ वर जमलेल्या अनेक हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकरी, पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजविण्यात आली होती.
–