जनता सहकारी बँकेस 2 कोटी 25 लाखांचा नफा – चेअरमन अतुल जाधव विनोद कुलकर्णी यांची माहिती

359
Adv

सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा लौकिक असणारी व जिल्हयात मुख्य कार्यालयासहित एकूण 17 शाखांव्दारे जिल्हावासियांना बँकिंग सेवा देणारी जिल्हयातील अग्रणी जनता सहकारी बँक लि. सातारा ने गत आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 2 कोटी 25 लाख इतका विक्रमी नफा कमविलेला आहे. बँक लवकरच सभासदांना लाभांश देण्यासाठी रिझवर्ह बँक ऑफ इंडियाकडे शिफारस करणार आहे, अशी माहिती भागधारक पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

श्री. कुलकर्णी यांनी यावेळी बँकेच्या सभासदांनी, ठेवीदारांनी, कर्जदारांनी बँकेवर दाखविलेला विश्वास बँकेच्या सर्व संचालक मंडळाने एकमुखाने घेतलेले धोरणात्मक निर्णय व संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयाची सर्व कर्मचारी व अधिका-यांनी काटेकोरपणे केलेली अंमलबजावणी यामुळेच बँकेने मागील पाच वर्षात दोनदा तोटयात गेलेली बँक पुन्हा नफ्यात आणण्याचे अभूतपूर्व, प्रेरणादायी व शून्यातून पुन्हा उभे राहण्याचा आदर्श घेण्यासारखे अप्रतिम असे यश संपादन केल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, बँकेने जी.एस.टी., नोटाबंदी यासारख्या अचानक उदभवलेल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही विक्रमी अशी 80 सेवकांची भरती बँकेत केली आहे. कोविड-19 विषाणू संसर्गाच्या काळात सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढत असताना बँकेने मात्र भरती केलेल्या सर्वच्या सर्व सेवकांना एका वर्षाच्या अल्प कालावधीतच बँकेच्या सेवेत कायम करुन घेतलेले आहे. त्याचबरोबर बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी सलग तीन वर्षे बँकेचा कारभार कोणतीही वेळ,काळ न बघता जास्तीत जास्त बँकेस वेळ देऊन वेळप्रसंगी बँकेचे थकीत कर्जदार सभासदांच्या विरोधात, कठोरपणे कायदेशीर कारवाई करुन, बँकेच्या प्रगतीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशा पध्दतीने बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या सदस्याच्या सहकार्याने, पारदर्शकपणे कारभार करुन बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बँकेने मागील तीन वर्षात थकीत कर्ज वसुलीसाठी लहान, मोठा कर्जदार असा कोणताही भेदभाव न करता अतिशय कठोरपणे थकीत कर्ज वसुली केल्यामुळेच बँकेचे एन.पी. कर्ज खात्यांमध्ये विक्रमी अशी 11 कोटींची कर्जवसुली केलेली आहे. त्यामुळे नेट एन.पी.ए. चे प्रमाण 8.30 टक्के, त्याचप्रमाणे बँकेच्या स्थैर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सी.आर.ए.आर. हा रिझवर्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे कमीत कमी 9 टक्के राखणे आवश्यक असताना बँकेने मार्च 2021 अखेर तब्बल 16.31 टक्के इतका सी.आर.ए.आर. राखून बँकेची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत असल्याचे सिध्द केले आहे. रिझवर्ह बँकेने वेळोवेळी दिलेल्या सर्व सूचना व आदेशांचे बँकेने काटेकोरपणे पालन करुन कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या काळातही, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन बँकेची के.वाय.सी, सी.के.वाय.सी. सिबिल यासारखी महत्वाची कामे पूर्णत्वास नेऊन कर्ज वितरण करताना अग्रक्रम दुर्बल घटकांना द्यावयाचे कर्जाचे प्रमाण देखील योग्य त्या प्रमाणात राखून रिझवर्ब बँकेच्या तपासणी अहवालातील सर्व दोषांची पूर्तता त्वरित करुन घेतलेली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या ठेवीदारांसाठी 5 लाखांचे विमासंरक्षण प्राप्त असून त्यासाठी आवश्यक असणारा आगाऊ विमा हप्ता बँकेने विमा कंपनीकडे भरलेला असून त्याबाबतची रिसीट ही बँकेच्या मुख्य कार्यालयासहित सर्व शाखांच्या नोटीस बोर्डावर ग्राहकांच्या माहितीस्तव प्रसिध्द करण्यात आलेली आहे

बँकेच्या यशस्वी वाटचालीत नेहमीच महत्वाची भूमिका बजावणा-या सेवकांची देखील ग्रुप ग्रॅच्युईटी, प्रॉ. फंड, व प्रॉ.फंड रक्कमेचा विमा हप्ता (इडली विमा), रजेचा पगार इत्यादी मार्च-21 अखेरची सर्व देणी सेवकांना अदा करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे कोविड-19 विषाणू संसर्गाचा कालावधीतच जनता बँक कर्मचारी संघाबरोबर वेतन करार केलेला असून सेवकांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. याशिवाय रिझवर्ह बँकेच्या सूचनेनुसार 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल 45 लाख इतकी प्रशासकीय खर्चात कपात करुन ठेवीदार, सभासद यांच्या हितास सर्वप्रथम प्राधान्य देवून बँकेचा सर्व कारभार अत्यंत काटकसरीने केलेला आहे. बँकेच्या या यशात बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

Adv