सातारा -जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पोवई नाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर बुधवारी दि.३० रोजी दुपारी ४ वाजता महाअभिषेक व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे .नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली आहे.तसेच या कार्यक्रमाला सर्व सातारकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी शिवेंद्रसिंहराजे मित्र समूहाच्या वतीने सातारा शहरासह तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक तसेच पंचगंगेच्या जलाने महाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक अमोल मोहिते यांनी केले असून या कार्यक्रमाला सर्व सातारकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.





