सातारा शहराच्या वाहतूक कोंडी ला पर्याय ठरलेल्या बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा पालिकेकडे करण्यात येणार आहे . या तयारीचा भाग म्हणून सातारा पालिका व बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी सोमवारी सकाळी करण्यात आली . अंर्तगत मार्गिकांचे पाण्याचे आऊटलेट स्वच्छ करण्याची मागणी सातारा विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अॅड दत्ता बनकर यांनी केली .
या पाहणीच्या वेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, शाखा अभियंता रविराज आंबेकर यावेळी उपस्थित होते .
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रेड सेपरेटरची देखभाल दुरुस्ती सातारा पालिकेकडे द्यावी अशी सूचना ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात केली होती . त्यानुसार आज सकाळी पालिका आणि बांधकाम विभागाचे संयुक्त पाहणी सोमवारी सकाळी पार पडले .आज पुन्हा अंर्तगत रस्त्यांची तसेच कोणत्या सुविधा द्यायच्या या संदर्भाने चर्चा करण्यात आली . रस्त्यालगत पाण्याचे जे आऊटलेट आहेत त्या सर्व स्वच्छ करून मिळाव्यात शिवाय अंर्तगत भागात रस्त्यावर येणारे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था असावी अशी मागणी अॅड दत्ता बनकर यांनी केली . ग्रेड सेपरेटरमध्ये लावण्यात आलेले दिवे सुरू आहेत का ? याचीही चाचपणी झाली .आपत्कालीन स्थितीत लाईट गेल्यास त्यासाठी पॉवर जनरेटरची सोय करण्यात येणार आहे याशिवाय रस्त्यांची कामे पालिकेच्या वार्षिक मंजूर दराने करण्यात येतील . ग्रेड सेपरेटरच्या हस्तांतरणाची प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण करण्यात येईल असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .