सातारा शहरात धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत सातारा शहरात धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक उभे करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व साताऱ्यातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे केली आहे .
जलमंदीर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा शहरात होणाऱ्या धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .कराङ येथे होणाऱ्या भव्य स्मारकासारखेच धर्मवीर संभाजीमहाराज यांचे भव्य स्मारक सातारा येथे व्हावे अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमीं तर्फे करण्यात आली तसेच पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाचे काम दर्जेदार करावे तसेच किल्ले अजिंक्यतारा येथे ज्या छत्रपती शाहु महाराजांनीशाहुनगरी वसवली व मराठा साम्राज्य अटकेपार नेले व दिल्ली वरती भगव्या ध्वजाची पताका फडकवली त्यांचे स्मारक करावे अश्या आशयाचे निवेदन आज खासदार श्रीमंत छत्रपती यांना यांनी देण्यात आले
याबाबत खासदार छ उदयनराजे भोसले यांनी या प्रकल्पासाठी लवकरच निधी ऊपलब्ध करून देण्याचे व भव्य स्मारक करण्याच्या दृष्टीने तशा सुचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजीत बापट यांना दिल्या तसेच यावेळी पोवई नाका शिवतीर्थाचे काम येत्या पंधरा दिवसात चालु करणार असल्याचे त्यांनी सांगितले व या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, कोडोलीचे युवा नेते अमोल भाऊ तांगडे संग्राम बर्गे, मा नगरसेवक सागर साळुंखे, पंकज चव्हाण सौरभ सुपेकर विनीत पाटील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख प्रमुख श्री सतिश बापु ओतारी, विशाल चव्हाण, शशिकांत पवार, अजिंक्य गुजर, शुभम शिंदे, राहुल इंगवले, सचिन जाधव, विजयसिंह बर्गे, अमोल खोपडे, ऋषिकेश भोसले, विशाल बारटक्के, सुमित राऊत, आदीत्य घोरपङे, राजु पंडीत व शिवप्रेमी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.







