Tuesday, April 7, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City चैतन्य रेसिडेन्सीच्या रहिवाशांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

चैतन्य रेसिडेन्सीच्या रहिवाशांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

259
Adv

सातारा शहरातील गुरुवार पेठ सिटी सर्वे क्रमांक 383 येथील चैतन्य रेसिडेन्सी च्या रहिवाशांनी सामूहिकरीत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत इमरान अल्ताफ शेख यांनी बेकायदेशीर बांधकाम करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने सदनिका धारक संतप्त झाले आहे

ओरिएंटल डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर इमरान शेख यांच्या विरोधात सदनिका धारकांची तक्रार आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार शेख यांनी संगनमताने आणि दांडगाईने इमारतीच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून इमारतीला धोका उत्पन्न केला आहे नगरपालिकेकडे सदनिका धारकांनी तक्रार करूनही पालिकेच्या बांधकाम विभागाने कोणतीही नोटीस बजावणी केली मात्र फौजदारी कारवाई केलेली नाही . 11 जुलै 2012 रोजी संबंधित इमारतीला पूर्णत्व दाखला देण्यात आला आहे त्यामुळे सदर तारखे नंतर केलेले कोणतेही बांधकाम हे अनधिकृत आहे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना सुरू झालेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात वेळोवेळी कल्पना देऊनही अद्याप यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही जनरेटा वाढल्यानंतर 10 ऑक्टोबर 2022 व 22 डिसेंबर 2022 या पत्राद्वारे इमरान शेख यांना बांधकाम त्वरित काढून घेण्याबाबत नगरचना अधिनियम 66 प्रमाणे 52 53 ची नोटीस बजविण्यात आली होती मात्र त्यांनी त्या नोटिशन बांधकाम सुरूच ठेवले

संस्थेच्या आवारातील असलेल्या पुरातन मंदिरासमोर अनधिकृत संडास टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे परिसरातील भाविकांना या पवित्र स्थानाचे दर्शन घेण्यासाठी अटकाव करण्यात आला आहे त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा व सामाजिक तेढ निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे सातारा पालिकेचे भाग निरीक्षक प्रकाश शिर्के यांच्यामार्फत सदर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने इमरान शेख यांचे बांधकाम सुरू आहे संस्था सभासद संजीव सुपेकर यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगररचनाकार धनके भाग निरीक्षक प्रकाश शिर्के यांना बांधकामा बाबत परिस्थिती कळवली होती तथापि त्यांच्याकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे सहकार्य गृहनिर्माण संस्थेतील विनापरवाना बांधकाम मागणी करूनही निर्णय न झाल्याने संबंधित रहिवाशांनी संतप्त होऊन प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे

Adv