अखेर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश ४८ कोटीपैकी २५ कोटी प्राप्त

448
Adv

सुमारे दिडवर्षापूर्वी झालेल्या सातारा नगरपरिषदेच्या हद्बाढीत समाविष्ट झालेल्या भागातील विविध कामांसाठी सातारा नगरपरिषदेने सुमारे ५२ कोटीरूपयांचा विस्तृत विकास आराखडा तयार केला होता,त्यास
नगरपरिषदेच्या जनरल कौन्सिलची मंजूरी घेवून, सदरचा विकास आराखडयानुसार विशेष निधी मिळण्याबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित करण्यात आले होते. याकामी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची आम्ही समक्ष भेट घेवून याचा सतत पाठपुरावा केला हद्बाढ भागातील नागरीकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहीजेच ही आमची समाजकेंद्रीत धारणा आहे. आमच्या या प्रयत्नांना यश आले असून, शासनाकडून ४८ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळालेली आहे. असे यापुर्वी सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा श्रीमंत छ उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली होती. दरम्यान गत महिन्यात ५८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजूरी मिळुन, पैकी १० कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आणि आज ४८ कोटींच्या हद्दवाढ भागातील कामांना मंजूरी प्राप्त झाली असलेने यापैकी २५ कोटीचा पहिला हप्ता महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी दि.८ एप्रिल २०२२ च्या शासननिर्णयाने सातारा नगरपालिकेकडे वर्ग केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी नमुद केले आहे की,शाहुपूरी, शाहूनगर, बिलासपूर, खेड, येथील भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाला. बहुप्रतिक्षित हदवाढ झाल्याने आमच्याबरीत जबाबदारी देखिल वाढली होती. प्रत्येक कुटुंबाला मुलभुत सुविधा मिळाल्याच पाहीजेत किंबहुना सार्वजनिक सोयी सुविधांच्या माध्यमातुन त्यांचे राहणीमान अधिक सुखद झाले पाहीजे
याच जाणिवेतून, विचारांचा विरोध नसलेले/असलेले प्रत्येक कुटुंब आमच्या परिवारातीलच आहे अशी आमची प्रामाणिक भावना असल्याने, याभागाच्या सर्वांगिण विकासाकरीता,सातारा नगरपरिषदेने हद्दवाढ भागातील परिसराची सुक्ष्म पहाणी करुन, तेथील आवश्यक असलेल्या कामांचा खाली नमुद केलेप्रमाणे
आराखडा तयार केला असुन सदरची कामे पुर्ण करणेसाठी २५ कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झालेने तातडीने कामे मार्गी लागतील हद्दवाढ भागातील, ३.७५ मिटर रुंदीचे ६ कोटी ५६ लाख, ५.५० मिटर रुंदीचे रस्ते रुपये ७कोटी ४५ लाख, ७.५० मिटर रुंदीचे २ कोटी ९४ लाख रुपयांचे रस्ते,
हद्दवाढ ३.७५ मिटर रुंदीचे रुपये ४ कोटी ७३ लाखांचे नवीन रस्ते, ५.५० मिटर रुंदीचे ३कोटी ३३ लाखांचे नवीन रस्ते, ७.५० मिटर रुंदीचे नवीन रस्त्यांसाठी रुपये ८ लाख रुपये,
४०० बाय ६०० मापाचे आरसीसी गटर्स रुपये ६ कोटी ७० लाख, ६०० बाय ७५० मापाचे आरसीसी गटर्स करणेकामी रुपये ३ कोटी ४ लाख विविध ठिकाणी स्ट्रीट लाईटस उभारणेकामी रुपये ३ कोटी ४८ लाख,मोकळया जागांचा विकास आणि वृक्षारोपण करणेकामी रुपये ४ कोटी ६३ लाख, आणि सुमारे ४ कोटी ३३ लाखांचे अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणेची विविध कामे पुर्णत्वास जातील.आता राज्य शासनाकडून याकामी ४८ कोटीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे. लवकरच उर्वरीतहसे नगरपरिषदेस प्राप्त होणार आहेत. हवाढ भागाचा समतोल विकास साधताना, बचतगटांच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण, रोजगार निमिर्ती, बाग-बगिचे आणि उद्याने विकसित करणे,दर्जेदार रस्ते-गटर्स, पाईपड्रेन, स्ट्रीट लाईटस् इ.कामांबरोबरच शाश्वत विकासाची कामे मार्गी लावण्यात येतील. मंजूर हद्बाढ विकास प्रकल्पानुसार प्रशासकीय कार्यवाही करुन, लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे. दरम्यान, शाहुनगरच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून सादर केलेल्या प्रस्तावास सुमारे २८ कोटींचा निधी सुध्दा लवकरच मंजूर होईल. त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न अव्याहतपणे सुरु आहेत पाठपुराव्यात आम्ही कुठे कमी पडणार नाही असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे.

Adv