खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी उभ्या आयुष्यात राजकीय आणि सामाजिक जीवनाची वाटचाल सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानूण केली आहे. गोर गरीब ,बळीराजा, आणि तरुणाचे प्रश्न पोटतिडकीने शासन दरबारात मांडण्याचे काम केले आहे. थंडीत कुडकूडणार्या निराश्रीताना मायेची चादर पांघरली आहे. राजकारणा पेक्षा समाज कारनाला महत्व देणारे, जगावेगळे अद्वितीय नेतृत्व असल्याने. अबाल वृद्धांचे श्रद्धास्थान तर तरुणांचे आयडॉल होऊन ह्रदयसिंहासनावर आरूढ झाले आहेत., असे प्रतिपादन सुनील तात्या काटकर यांनी केले.
माहेर संस्था कारंडवाडी,शासकीय पुरुष भिक्षेकरीगृह, एहसास मतिमंद मूलांची शाळा वळसे, आशा भुवन मतिमंद मुलांचे शासकीय केंद्र, मातोश्री वृद्धाश्रम महागाव, सिव्हील हॉस्पिटल सातारा आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून सामाजिक बंधीलकी जोपासून सुनील काटकर (तात्या), राजे प्रतिष्ठान,शेतकरी संघटना, हिरकणी फौंडेशनच्या वतीने, विविध ठिकाणी अन्नदान आणि फळ वाटप करण्यात आले.
या वेळी बोलताना सुनील काटकर म्हणाले, अन्नदान,रक्तदान, नेत्रदान आणि देहदान ही चार दान सर्वात श्रेष्ठ आहेत. उदयनराजे एक सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. असे स्पष्ट करून ते म्हणाले, भुकेलेल्यांना दोन घास भरवण्याचे काम त्यांच्या हातून सातत्याने होत असतात. राज घराण्यात जन्माला येऊनही वागणे-बोलणे सरळ साधं, आचार विचार कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहेत म्हणूनच उदयनराजे खरे जनकल्याणकारी नेते असल्याचे सुनील काटकर म्हणाले.
खा. उदयनराजे राजकारणापेक्षा समाजकार्यास अधिक प्राधान्य देत असल्याने त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या संस्था समाजातील निराश्रीताना सांभाळण्याचे काम करून सामाजिक बांधिलकी जोपासतात त्या संस्थांमध्ये अन्नदान करण्याचा निर्णय घेऊन कार्य सिद्धीस नेले. त्याच बरोबर कोरोना काळात जीवाची बाजी लाऊन सर्वसामान्य कोरोना बाधित रुग्णासाठी रात्रंदिवस झटणारे शासकीय रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी,परिचारिका,चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले. या वेळी सुमारे १५० जणांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.याचवेळी शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुनिल काटकर ( तात्या ) जि.प. माजी शिक्षण सभापती , पै.संतोष घाडगे ( मामा ) राजे प्रतिष्ठान अध्यक्ष , विकास जाधव शेतकरी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष , राजू पाटील उपाध्यक्ष , शरद काटकर , हरीष पाटणे , विनोद कुलकर्णी , दिपक प्रभावळकर , समृध्दी जाधव ( बाबा ) , अॅड . अंकुश जाधव , अॅड . अजय मोहिते , अॅड . विकास पवार , अॅड . विनीत पाटील , अॅड . संदेश कुंजीर , अॅड . अनुप गाडे , प्रशांत निंबाळकर , जयश्री शेलार , सचिन नलवडे , सुनिल महाडीक , सुनिल बर्गे , अशोक जगताप , पै . बंडा जाधव , भाऊ भोसले , सतीश माने , अमोल तांगडे , तेजस जगताप , प्रशांत जाधव , मनोज सोळंकी , प्रमोद महाजन , शुभम घोरपडे , राहुल महाजन , सागर कदम , नितीन सगरे , अक्षय भाऊ विशाल पानस्कर , संतोष घाडगे ( चेअरमन ) प्रविण पवार , शुभम घोरपडे , संकेत पवार , किशोर जाधव , किरण कोळी , बाळासाहेब भोसले ( काका ) , सागर आप्पा वाघमारे , पिंटू पवार , प्रविण फाळके , अभि इंगळे , स्वप्नील सपकाळ , संदीप म्हेत्रे , फादर अनीश जोसेफ , बजरंग खाडे , सुर्यकांत सगरे , संजय कांबळे सर व सर्व सुनिल काटकर ( तात्या ) मित्रसमुह उपस्थित होते.