Saturday, July 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City कोट्यावधी रुपयांच्या पाझर तलावात गाळाचे साम्राज्य, ना शेतीसाठी पाणी ना पिण्यासाठी!

कोट्यावधी रुपयांच्या पाझर तलावात गाळाचे साम्राज्य, ना शेतीसाठी पाणी ना पिण्यासाठी!

286
Adv

कोकणात शेतीला प्रोत्साहन मिळावे व कोकणातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीकडे वळावे यासाठी शासनाने गावोगावी पाझर तलावांचे जाळे विनले.सुमारे नव्वदच्या दशकात कोकणात वाहुन जाणारे पाणी बारमाही उपयोगात यावे म्हणुन राज्य शासनाने खोडोपाडी बांधलेले पाझर तलाव आजच्या घडीला गाळाने पुर्णत: भरल्याने पाणी साठवण क्षमताच संपुष्टात आली आहे. परिणामी धरण आहे उशासी पण कोरड मात्र घशाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे. या पाझर तलावामध्ये आता पाणीसाठाच होत नसल्याने ना शेतीला पाणी ना पिण्यासाठी पाणी अशी स्थिती कोकणवासियांवर ओढवली आहे.
कोकणात शेतीला प्रोत्साहन मिळावे व कोकणातील शेतकऱ्यांनी बारमाही शेतीकडे वळावे यासाठी शासनाने गावोगावी पाझर तलावांचे जाळे विनले. छोट्या छोट्या ओढ्यांवर हे पाझर तलाव उभारले गेले. त्यातुन कोकणातील भुजल पातळीही कमालीची वाढली होती. मात्र या पाझर तलावातील गाळ गेल्या तीस चाळीस वर्षात कधीही उपसला गेला नसल्याने आज हे पाझर तलाव पुर्णत: गाळाने भरले गेले आहे.

Adv