हद्दवाढ झालेल्या गेंडामाळ भागातील सुमारे १ एकर स्वमालकीची जागेत एस.टी.पी.प्लॅन्ट उभारणे बाबत सादर केलेल्या सुधारित भुयारी गटर योजनेच्या प्रस्तावास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उच्यस्तरीय बैठकीत आज मान्यता देण्यात आली आहे. सन २०१७ साली सदरबझार पुरुष भिक्षेकरी गृहाच्या परिसरातील शासनाचे जागेत एसटीपी प्लॅट उभारणेचे नियोजन होते. तथापि शासनाकडून तीन-चार वर्षे पाठपुरावा करुनही जागा मिळत नाही असे दिसताच, सातारा विकास आघाडीने नगरपरिषदेच्या स्वतःच्या जागेत एसटीपी प्लॅन्ट उभारणेचा निर्णय घेतला. त्यास मंजूरी मिळाल्याने, भुयारी गटर योजनेचा हा महत्वाचा टप्पा सातारा विकास आघाडीने पूर्ण केला आहे.
सातारा विकास आघाडीने सन २०१७साली, पुढील २५ वर्षांची लोकसंख्या विचारात घेवून,नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्या करीता, भुयारी गटार योजना राबविणेचा निर्णय घेतला. सातारा शहराचा पूर्वभाग, मध्यवर्तीभाग आणि पश्चिम भाग असे एकूण तीन भाग पाडून, मलनिस्सारणाची भुयारी गटर योजना आखण्यात आली. केंद्र सरकारचा ५० टक्के निधी नगरपरिषद सातारा यांचा टक्के निधी अश्या गुणोत्तरामध्ये सुमारे ५१ कोटी रूपयांच्या भुयारी गटर योजनेच्या प्रस्तावास दि.२५/०८/२०१७ मध्ये शासनाने मंजूरी दिली.
या प्रस्तावित योजनेमधील एसटीपी प्लॅट करीता, पुरुष भिक्षेकरी गृहाच्या परिसरातील शासनाची जागा निश्चित करण्यात आली होती.नगरपरिषदेच्या जागा मागणी प्रस्तावा नुसार
जिल्हाधिकारीसातारा यांनी जरुर त्या शिफारशीसह राज्य शासनाला सन२०१७ मध्येच जागा उपलब्ध करुन देण्याची शिफारस राज्यशासनास केली.या प्रस्ताबाचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.
सातारा शहराच्या पश्चिम भागातील पहिल्या टप्यातील काम ७० टक्के पूर्ण होत आले आहे. तरी सुध्दा सदरबझार येथील शासकीय जागा मिळत नसल्याने आणि सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ होवून, एकंदरीत कार्यक्षेत्र वाढल्याने, हददवाढ झालेल्या भागातील नगरपरिषदेच्या मालकीची करंजे स.नं. ३८७-अ, ३८७-च आणि ४१० येथील जागेपैकी सुमारे १ एकर जागेत एसटीपी प्लॅट उभारणेचे आणि हददवाढीच्या अनुषंगाने जरुर ते बदल करण्याबाबतचा भुयारी गटर योजनेचा सुधारितनगरपरिषदेने तयार करुन,शासनास सादर केला.
शासनाची जागा मिळत नाही म्हणून नागरीकांची आरोग्य सुविधा रखडवायची नाही अशी धाडसी आणि धोरणात्मक भुमिका घेवून सातारा विकासा आघाडीने नगरपरिषदेच्या माध्यमातुन सुचविलेली करंजे गेंडामाळ येथील स्वमालकीच्या जागेत एसटीपी प्लॅट उभारणेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. भुयारी गटर योजनेच्या सुधारित मंजूरीमुळे आता एसटीपी प्लॅन्ट करंजे येथील नगर परिषदेच्या स्वमालकीच्या जागेत उभारण्यात येणार आहे.
शासनाने सुधारित भुयारी गटर योजनेला मंजुरी दिल्याने आता या योजनेला गती मिळुन मलनिस्सारणाची दर्जेदार सुविधा सातारकरांना मिळणार आहे.सातारा विकास आघाडीचे हे धोरणात्मक यश आहे.