ऐतिहासिक बाजांच्या पथदिव्यांचे साताऱ्यात लोकार्पण

471
Adv

सातारा पालिकेने मोती चौक ते देवी चौक या दरम्यान राजपथावर उभारलेल्या ऐतिहासिक शैलीच्या पथदिव्यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . या पथदिव्यांमुळे राजपथ वेगळ्या सौंदर्याने उजळल्याची प्रतिक्रिया छत्रपती उदयनराजे यांनी यावेळी दिली . या दीपमाळेसाठी सातारा पालिकेने पन्नास लाख रुपये खर्च केले आहेत .

सातारा शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यांमध्‍ये राजपथाचा समावेश आहे. या राजपथाभोवती सातारा शहराचे अर्थकारण फिरत असून या मार्गाच्‍या सुशोभिकरणासाठी पालिका नेहमी सतर्क असते. ऐतिहासिक महत्त्‍व असणाऱ्या या राजपथाच्‍या सुशोभिकरणाचा निर्णय काही महिन्‍यांपूर्वी पालिकेने घेतला होता. यानुसार या मार्गावर दुतर्फा ऐतिहसिक बाज आणि ठेवणीच्‍या ५० दीपमाळा बसविण्‍याचे ठरविण्‍यात आले. यासाठीचे काम गुजरात येथील एका कंपनीस देत दीपमाळेची बांधणी, मांडणीचा आराखडा पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट आणि माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे यांनी तयार केला. यानुसार हे काम होत आहे की नाही, याच्‍या पाहणीसाठी पालिकेच्‍या विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचारी देखील नेमण्‍यात आले.

सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्‍यानंतर त्‍या दीपमाळांचे लोकार्पण काल (सोमवारी) खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्‍याधिकारी अभिजित बापट, माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेविका स्‍मिता घोडके, अलाउद्दीन शेख, काका धुमाळ तसेच राजपथावरील व्‍यापारी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. एकाचवेळी सर्व दीपमाळा प्रकाशित झाल्‍याने राजपथावर लखलखाट पसरला होता

Adv