Monday, April 20, 2026
spot_img
Home Latest News Politics महाशिवरात्रीच्या तोंडावर रताळ्याच्या भावात घसरण

महाशिवरात्रीच्या तोंडावर रताळ्याच्या भावात घसरण

246
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":3},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

येथील शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेऊन गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली जात आहे. लोणगाव येथील प्रत्येक शेतकऱ्यांने 1 ते 4 एकरापर्यंत, तर अल्पभूधारक शेतकऱ्याने किमान 10 गुंठ्यांत रताळ्याची शेती करीत आहे.

लाेणगावात 200 हेक्टर जमीनीवर रताळ्याची लागवड करण्यात आली असून, लाेणगावला रताळ्याचे माहेर घर म्हणून ओळखले जात आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण तोंडावर आला असल्यामुळे रताळी काढणीला वेग आला आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा रताळ्याच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार ते 1200 रूपये दराप्रमाणे व्यापारी खरेदी करीत आहे. या वर्षी उत्पादनात निम्याने घट झालेली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे.

लोणगाव येथील शेतकऱ्यांचा रताळ्याची शेती करण्यावर अधिक भर आहे. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला फराळ म्हणून मोठी मागणी असते. शेतकऱ्यांनी महाशिवरात्री जवळ आल्यामुळे जमिनीतून रताळ्यांची काढणी सुरू केली आहे. ही रताळी महाशिवरात्रीला बाजारात विक्रीसाठी नेली जाते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. गतवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रताळे लागवडीवर अधिक भर दिला होता.

Adv